विकृत सैन्य अधिकारी गजाआड, पत्नीला देत होता ‘ही’ धमकी!

भारतीय सैन्यदलात कॅप्टन पदावर कार्यरत असलेल्या एका विकृत अधिकाऱ्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. या विकृत अधिकाऱ्याने पत्नीचा छळ करून तिचे अश्लील फ़ोटो काढून सोशल साईटवर टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित पत्नीने डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून पती विरोधात गुन्हा दाखल केला होता. या आधारे रामनगर पोलिसांनी प्रशांत मोरे या विकृत पतीस पुण्याच्या सैन्य […]

विकृत सैन्य अधिकारी गजाआड, पत्नीला देत होता ‘ही’ धमकी!

भारतीय सैन्यदलात कॅप्टन पदावर कार्यरत असलेल्या एका विकृत अधिकाऱ्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. या विकृत अधिकाऱ्याने पत्नीचा छळ करून तिचे अश्लील फ़ोटो काढून सोशल साईटवर टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित पत्नीने डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून पती विरोधात गुन्हा दाखल केला होता. या आधारे रामनगर पोलिसांनी प्रशांत मोरे या विकृत पतीस पुण्याच्या सैन्य तळावरून अटक केली आहे.

आरोपी प्रशांत याचा 2015 मध्ये विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर काही दिवसांनी तो पत्नीचा छळ करत असल्याचा आरोप पीडितेने केला. त्याने पीडित पत्नीचे अश्लील फोटो काढून ते सोशल साईट्सवर टाकण्याची धमकी दिली, असा आरोपही पीडितेने केला. पतीच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित पत्नीने डोंबिवलीच्या रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला.

विशेष म्हणजे आरोपी प्रशांत यांची आजवर जिथे जिथे पोस्टिंग झाली. तिथे तिथे त्यांनी अनेक महिलांना नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याचा आरोपही पीडित पत्नीने केला आहे. याबाबत पीडितेकडे विचारणा केली असता, आपल्या पतीचं दुष्कृत्य समोर आणायचं असल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सैन्यदलाचे नाव आपल्याला बदनाम करायचे नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, आरोपी प्रशांत यांने न्यायालयात धाव घेवून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे रामनगर पोलिसांनी त्यांना पुण्याच्या सैन्यतळावरून अटक करून आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number