सर्वसामान्य वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव मतदार संघातील वारकऱ्यांना पंढरपूर वारीसाठी स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था करून देत अडीच हजार वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव मतदार संघातील वारकऱ्यांना पंढरपूर वारी करता यावी यासाठी रेल्वेची स्वतंत्र व्यवस्था करून दिल्याने अडीच हजार वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यावेळी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांसह आ. मंगेश चव्हाण हे सुध्दा तल्लीन झाल्याचे दिसले.
आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जावं असं अनेक भाविक भक्तांना वाटत असते, मात्र प्रत्येकाला ते शक्य नसते. भाविकांची ही अडचण लक्षात घेत चार वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मतदार संघातील अडीच हजार वारकरी आणि भाविकांना पांढरपूर येथे वारीसाठी आणि दर्शन घेण्यासाठी घेऊन जात असतात. अशाच पद्धतीने चाळीस गाव ते पंढरपूर अशी स्वतंत्र रेल्वे करून देत त्यांनी या वारकऱ्यांना पंढरपूर वारीचा आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या या रेल्वेने स्वतः मंगेश चव्हाण हे देखील निघाले आहेत.