दक्षिण भारतावरील टीकेमुळे ‘फस गए गुरू’!

पंजाब राज्याचे कॅबिनेट मंत्री माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्याने टीकेचे धनी ठरले आहेत. पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला उपस्थित राहून तसंच तेथील लष्करप्रमुखांच्या गळाभेटीमुळे भारतीयांचा रोष ओढावून घेतल्यानंतर सिद्धू यांनी पाकिस्तानची भलामण करताना दक्षिण भारतीयांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. ‘आपण तामिळनाडूनला गेलो, तर तिथली भाषा विचित्र असते. त्यांचा […]

दक्षिण भारतावरील टीकेमुळे ‘फस गए गुरू’!

पंजाब राज्याचे कॅबिनेट मंत्री माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्याने टीकेचे धनी ठरले आहेत. पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला उपस्थित राहून तसंच तेथील लष्करप्रमुखांच्या गळाभेटीमुळे भारतीयांचा रोष ओढावून घेतल्यानंतर सिद्धू यांनी पाकिस्तानची भलामण करताना दक्षिण भारतीयांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे.

‘आपण तामिळनाडूनला गेलो, तर तिथली भाषा विचित्र असते. त्यांचा आहार चांगला असला, तरी तो जास्त काळ नाही सहन करू शकत. दक्षिण भारताची संस्कृती वेगळी आहे. याउलट मी जेव्हा पाकिस्तानात जातो, तेव्हा तिथे आपलीच भाषा बोलली जाते, तसंच तिथली प्रत्येक गोष्ट ही खूप छान आणि आपली असते.’ असं विधान करत पाकिस्तान हे सांस्कृतिकदृष्ट्या दक्षिण भारतापेक्षा जास्त जवळचं असल्याचं सिद्धू यांनी सूचवलं.

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या या वक्तव्याचा दक्षिण भारतीय समाजाकडून निषेध करण्यात येत असून भिवंडीत भाजपा दक्षिण भारतीय आघाडीने नवज्योत सिंग सिद्धू याच्या फोटोस काळे फासत त्यास जोडे मारले आहे.  

दक्षिण भारतीय भाषा व तेथील आहार पद्धती ही वाईट असल्याचे सांगत त्यापेक्षा पाकिस्तान चांगलं, या विधानच्याविरोधात संपूर्ण दक्षिण भारतीय समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर दक्षिण भारतीय आघाडीच्या वतीने शहरातील धामणकर नाका या ठिकाणी भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत ‘नवज्योत सिंग सिद्धू मुर्दाबाद’च्या घोषणा लगावत त्याच्या फोटोस काळे फासलं आणि त्यानंतर फोटोस जोडे मारण्यात आले. 

 

“नवज्योतसिंग सिद्धू हा आक्रस्ताळी वक्तव्यासाठीच प्रसिद्ध असून त्याला जर भारतातील नागरिकांना बद्दल प्रेम नसेल आणि भारताविरोधात छुपे युद्ध पुकारणाऱ्या पाकिस्तानी शासन आणि लष्कराचा त्यांन जर एवढा पुळका असेल, तर त्याच्या फोटोला आता फक्त जोडे मारले आहेत. पण लवकरच त्याच्या विरोधात भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल करून भिवंडीत खेचू आणि त्याला तेव्हा जोड्याने मारू” असा इशारा भाजपा भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिला आहे. 

सिद्धू यांच्यावर सर्वत्रच टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे सिद्धू यावर काय उत्तर देतात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number