मंदिराच्या विटंबनेविरोधात धुळेकरांकडून निषेध

धुळे, १० जून २०२३, प्रतिनिधी : धुळे शहरात छत्रपती संभाजीनगरातील मंदिराच्या विटंबना विरोधात धुळे शहरात शनिवारी निषेध मोर्चाचा आयोजन करण्यात आला आहे. सकल हिंदू समाज संघटनांकडून हिंदू जनक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चामध्ये हजारो हिंदू तरुण-तरुणी महिला सहभागी होणार असल्याचा आयोजकांनी सांगितले आहे. या हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी पोलीस प्रशासनाने ही जय्यत तयारी […]

मंदिराच्या विटंबनेविरोधात धुळेकरांकडून निषेध

धुळे, १० जून २०२३, प्रतिनिधी : धुळे शहरात छत्रपती संभाजीनगरातील मंदिराच्या विटंबना विरोधात धुळे शहरात शनिवारी निषेध मोर्चाचा आयोजन करण्यात आला आहे.

सकल हिंदू समाज संघटनांकडून हिंदू जनक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चामध्ये हजारो हिंदू तरुण-तरुणी महिला सहभागी होणार असल्याचा आयोजकांनी सांगितले आहे. या हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी पोलीस प्रशासनाने ही जय्यत तयारी केलेली आहेत. तब्बल ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या मोर्चा वर लक्ष ठेवून राहणार आहेत.

तसेच एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी ही यासाठी तैनात करण्यात आली आहे. धुळे शहरात हा मोर्चा आयोजित करण्यात आला असला तरी बंदच आवाहान कोणीही केलं नसल्याचं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे धुळे शहरात केवळ हा एक मोर्चा आयोजित करण्यात आलेला असून बंद नाही असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number