मंदिर संस्थांनाच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदीर आणि आणि परिसराच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील काही बाबींवर पुजारी मंडळाने आक्षेप घेतला आहे. यासाठी पुजारी मंडळाच्यावतीने लाक्षणिक उपोषण सुरू आहे.

मंदिर संस्थांनाच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण

३० जुलै, २०२४, धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदीर आणि आणि परिसराच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील काही बाबींवर पुजारी मंडळाने आक्षेप घेतला आहे. तुळजापुर मंदीर आणि मंदीराच्या पुर्वेच्या बाजूस विकास करण्यात यावा, अशी पुजारी मंडळाची मागणी आहे. यासाठी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या प्रवेशद्वारावर पुजारी मंडळाच्यावतीने लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलं आहे. आमचा विकासाला विरोध नाही तर, जो विकास होणार आहे तो मंदिराच्या पुर्वेला करावा, अशी मागणी पुजारी मंडळ आणि तुळजापुरातील नागरीकांनी केली आहे. दरम्यान, याबाबत निर्णय न झाल्यास यापुढे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे, तुळजाभवानी मंदीराच्या विकास आराखड्यावरुन पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number