२० जुलै, २०२४ रायगड : वीज पुरवठा आणि बिलाच्या समस्यांनी त्रस्त झालेले कर्जतकर नागरिकांनी शनिवारी महावितरणच्या विरोधात मुकमोर्चा काढला. कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने याचे आयोजन केले होते. पाऊस असूनही महिला देखील या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अभियंत्यांची भेट घेऊन समस्यांवर चर्चा केली. यावर, सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले. ३१ जुलैपर्यंत सुधारणा झाली नाही तर, १ ऑगस्टपासून साखळी उपोषण आणि १५ ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.