जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. राज्य गुप्तचर विभागानं ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेबाबतचा अहवाल दिला. त्यानंतर राज्य सरकारने तात्काळ सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंची झेड सुरक्षा झेड प्लस करण्यात आलीय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या सभोवताली सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा असणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. राज्य गुप्तचर विभागानं ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेबाबतचा अहवाल दिला. त्यानंतर राज्य सरकारने तात्काळ सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला.
उद्धव ठाकरेंची झेड सुरक्षा झेड प्लस करण्यात आलीय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या सभोवताली सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा असणार आहे.