महाराष्ट्र राज्यात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या पार्श्वभूमीवर MFUCTO या शिक्षक संघटनेनं 25 सप्टेंबर 2018 पासून बेमुदत काम बंद आंदोलन जाहीर केलं आहे.
या संघटनेच्या विविध मागण्या आहेत, या मागण्यांसाठी राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आजपासून संप पुकारला आहे.
एमपुक्टो संघटनेनं हा प्राध्यापकांचा संप पुकारला असून प्राध्यापकांचं मानधन वाढवावं ही प्रमुख मागणी प्राध्यापकांनी केली आहे.
प्राध्यापकांच्या या कामबंद संपाचा परिणाम महाविद्यालयांवर होणार आहे.