प्रियंका गांधींनी डोसे करपवले

मुंबई , २७एप्रिल २०२३, प्रतिनिधी :ऐन प्रचारात काँग्रेसला अपशकुन प्रियंकाच्या करपलेल्या म्हैसूर डोश्याचं काँग्रेसला कोण कौतुक गांधी घराण्यातील घटक आणि वाड्रांच्या सुनबाई प्रियंका सध्या काँग्रेसच्या प्रचारात आहेत. म्हैसूर येथे प्रचार करताना प्रियंका यांनी एका कार्यकर्त्याच्या हॉटेलातल्या भटारखान्यात प्रवेश केला. तिथं तापलेल्या तव्यावर त्यांनी एकापाठोपाठ एक सहा डोसे घातले. आणि फोटोसुद्धा काढून घेतले. विशेष म्हणजे काँग्रेसनं […]

प्रियंका गांधींनी डोसे करपवले

मुंबई , २७एप्रिल २०२३, प्रतिनिधी :ऐन प्रचारात काँग्रेसला अपशकुन
प्रियंकाच्या करपलेल्या म्हैसूर डोश्याचं काँग्रेसला कोण कौतुक

गांधी घराण्यातील घटक आणि वाड्रांच्या सुनबाई प्रियंका सध्या काँग्रेसच्या प्रचारात आहेत. म्हैसूर येथे प्रचार करताना प्रियंका यांनी एका कार्यकर्त्याच्या हॉटेलातल्या भटारखान्यात प्रवेश केला. तिथं तापलेल्या तव्यावर त्यांनी एकापाठोपाठ एक सहा डोसे घातले. आणि फोटोसुद्धा काढून घेतले. विशेष म्हणजे काँग्रेसनं येवढाच व्हिडिओ ट्विट करत प्रियंका गांधींचे कौतुक सुरू केलं.व्हिडीओ ८७ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं पण या सगळ्या लांगुलचालनावर शांत बसतील ते नेटकरी कसले.

नेटकऱ्यांनी करपवलेल्या डोश्यांना शोधून काढलंच आणि प्रियंकांचा डोसे प्रयोग फसला हे समोर आलं. प्रत्यक्षात काँग्रेसनं अर्धवट दाखवलेल्या व्हिडिओत प्रियंका डोसे घालताना दिसल्या. मात्र, थोड्या वेळाने डोसे परतल्याचं लपवलं गेलं. तेच नेटकऱ्यांनी समोर आणत प्रियंकांनी डोसे करपवून टाकले होते, हे दाखवण्याची संधी सोडली नाही. सध्या या करपलेल्या डोश्यांच्या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतेय काँग्रेस ने हा व्हिडीओ का लपवला असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.

 

 

 

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number