‘देसी गर्ल’चा थक्क करणारा रिअल लाईफ स्टंट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अभिनेत्री प्रियांका चोप्राला ‘जय गंगाजल’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये स्टंट्स करताना आपण पाहिलचं असेल. चित्रपटात हे स्टंट्स प्रियांकाने स्वतः केलेले नसले तरी नुकताच तिच्या ‘रिअल’ लाइफमध्ये तिने एक असा स्टंट केला आहे की, तो पाहून प्रियांकाच्या चाहत्यांना धक्काच बसेल. प्रियांकाने चक्क तिच्या डोक्यानं एक ग्लास फोडला आहे. सध्या प्रियांकाच्या या स्टंटचा व्हिडिओ सध्या […]

‘देसी गर्ल’चा थक्क करणारा रिअल लाईफ स्टंट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अभिनेत्री प्रियांका चोप्राला ‘जय गंगाजल’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये स्टंट्स करताना आपण पाहिलचं असेल. चित्रपटात हे स्टंट्स प्रियांकाने स्वतः केलेले नसले तरी नुकताच तिच्या ‘रिअल’ लाइफमध्ये तिने एक असा स्टंट केला आहे की, तो पाहून प्रियांकाच्या चाहत्यांना धक्काच बसेल. प्रियांकाने चक्क तिच्या डोक्यानं एक ग्लास फोडला आहे. सध्या प्रियांकाच्या या स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पण प्रियांकाने असं का केलं असावं, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

खरं तर दिवसभर काम करून थकलेल्या या ‘देसी गर्ल’नं वैतागून हा सगळा प्रकार केल्याचं तिने स्वतः सांगितलय. सध्या प्रियांका ‘क्वॉन्टिको सीझन ३’ च्या शूटिंगसाठी न्यू यॉर्कमध्ये आहे. आपल्या चाहत्यांसाठी प्रियांका सोशल साइट्सवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करतच असते. तसेच तिने तिचा ग्लास फोडतानाचा हा व्हिडिओदेखील तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या व्हिडिओत प्रियांका आधी एका ग्लासातून वाइन पिताना दिसतेय. एक घोट घेतल्यानंतर ती रागाने तोच ग्लास तिच्या डोक्यावर आदळते आणि तो ग्लास फुटतो. या व्हिडिओमध्ये मागे ‘यू हॅड अ बॅड डे’ हे गाणंही वाजतंय.

हा व्हिडिओ शेअर करताना प्रियांकाने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की, ‘जेव्हा तुम्ही ‘नाइन टू वाइन’ म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त कामच करता, तेव्हा असंच होतं.’ पण हा प्रकार कुणीही घरी करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहनही तिने केलं आहे. सोबतच तिने DramaMama असं हॅशटॅगही केलं आहे.

प्रियांकाने व्हिडिओच्या खाली ‘breakaway glass!’असंही लिहिलंय. ‘ब्रेकअवे ग्लास’ याला ‘शुगर ग्लास’ असंही म्हटलं जात. कारण तो साखरेपासून बनलेला असतो. अगदी काचेच्या ग्लासासारखाच दिसणारा हा ग्लास पारदर्शी, नाजूक मात्र हलका असतो. हा ग्लास फोडला तरी इजा होण्याची शक्यता नसते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number