वृत्तसंस्था, मुंबई
काही सेकंदाच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका रात्रीत ‘स्टार’ झालेल्या प्रिया प्रकाशला तिच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टसाठी तब्बल 8 लाख रुपये मिळतात, अशी माहिती समोर आलीय.
प्रिया प्रकाशच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून तिच्या फॉलोअर्सची संख्या आता 51 लाखांच्यापुढे गेली आहे.
कमी वेळात फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झालेल्या स्टार्सच्या यादीत तिचा समावेश झाला आहे. ‘ओरू अडार लव्ह’ या मल्ल्याळी चित्रपटातून ती चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे.
प्रिया प्रकाशचा हा पहिलाच चित्रपट असून तो जून 2018 रोजी प्रदर्शित होत आहे.