वृत्तसंस्था, नवी दिल्ली
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम कुठलीही सोशल मीडिया साइट उघडली की सध्या एकच फोटो आणि एकच नाव दिसतंय ते म्हणजे प्रिया प्रकाश वारियरचं.
काळीज खल्लास करणाऱ्या अदांनी तमाम तरुणाईला पुरतं घायाळ केलंय. प्रियानं इन्स्टाग्रामवरील लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफला टक्कर दिलीये.
कतरिनाने काही महिन्यांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आणि 24 तासांत तिच्या फोलोअर्सची संख्या काही लाखांत पोहोचली. परंतु, कतरिनाचा हा रेकॉर्ड प्रियानं मोडलाय.
प्रियाच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला इन्स्टाग्रामवर 24 तासांत 10 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केलंय. हा वेग कतरिनाला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा कितीतरी अधिक आहे.