जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
खासगी गुप्तहेर रजनी पंडित 40 दिवसा नंतर करागृहातून आज बाहेर आल्यात. रजनी पंडित यांना सीडीआर प्रकरणात 38 दिवसानंतर सोमवारी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एस भैसारे यांच्या न्यायालयाने 20 हजारांच्या जातमुचलक्यावर आणि अटी शर्थीनुसार सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मंगळवारी जामिनाच्या प्रक्रियेमध्ये उशीर झाल्याने त्या ठाणे कारागृहातून बाहेर येऊ शकल्या नाही.
मात्र, आज रजनी पंडित या ठाणे मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आल्या. दोन दिवसांत पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितलयं.