धक्कादायक! मुख्याध्यापकाचे विद्यार्थ्यासोबत ‘हे’ कृत्य!

पुण्यात 14 वर्षीय विद्यार्थ्याला अश्लील व्हिडिओ दाखवून त्याच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या वानवडी परिसरातल्या एका शाळेतील मुख्याध्यापकानेच हे घृणास्पद कृत्य केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी त्याला समुपदेशिकेनेही मदत केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विन्सेट परेरा असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे तर […]

धक्कादायक! मुख्याध्यापकाचे विद्यार्थ्यासोबत ‘हे’ कृत्य!

पुण्यात 14 वर्षीय विद्यार्थ्याला अश्लील व्हिडिओ दाखवून त्याच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या वानवडी परिसरातल्या एका शाळेतील मुख्याध्यापकानेच हे घृणास्पद कृत्य केले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे यासाठी त्याला समुपदेशिकेनेही मदत केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विन्सेट परेरा असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे तर जॅकलिन वाझ असे महिला समुपदेशकेचे नाव आहे.

हा सर्व प्रकार 10 मार्च ते 12 मार्च दरम्यान शाळेतील मुख्याध्यापकाचे कार्यालय आणि रेस्टरुममध्ये घडला असल्याचं पीडित मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी मुख्याध्यापकाने पीडित विद्यार्थ्याला अश्लील व्हिडिओ दाखवून वेळोवेळी त्याच्याशी अश्लील चाळे केले. याबाबतची सर्व माहिती समुपदेशक महिलेलाही होती. तिने याबाबत शाळा प्रशासनाला कुठलीही माहिती न देता पीडित विद्यार्थ्याला याबाबत कुठेही वाच्यता न करण्याबाबत दम भरला. त्यामुळे पीडित विद्यार्थी हादरून गेला. ही गोष्ट विद्यार्थ्याने आपल्या पालकांना सांगितल्यावर हा सर्व प्रकार उघड झाला.

या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी वानवडी पोलिसात तक्रार दिली असून यासंदर्भात मुख्याध्यापक आणि महिला समुपदेशिकेविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात सामजिक कार्यकर्त्यांनी संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number