पंतप्रधान मोदींचा करिश्मा; चीनमध्ये ‘भारत माता की जय’ ची गर्जना

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी चीनला रवाना झाले. चीनला गेल्यावर तिथल्या भारतीयांशी तसेच  लहान मुलांबरोबरही मोदींनी संवाद साधला. चीनमधील शियामेन शहरात रविवारी रात्री पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत झाले. पंतप्रधान मोदींचे आगमन होताच चीनमध्येही ‘भारत माता की जय’च्या घोषणा ऐकायला मिळाल्या. चीनमध्ये 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान शियामेन शहरात ब्रिक्स देशांची […]

पंतप्रधान मोदींचा करिश्मा; चीनमध्ये ‘भारत माता की जय’ ची गर्जना

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी चीनला रवाना झाले. चीनला गेल्यावर तिथल्या भारतीयांशी तसेच  लहान मुलांबरोबरही मोदींनी संवाद साधला.

चीनमधील शियामेन शहरात रविवारी रात्री पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत झाले. पंतप्रधान मोदींचे आगमन होताच चीनमध्येही ‘भारत माता की जय’च्या घोषणा ऐकायला मिळाल्या.

चीनमध्ये 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान शियामेन शहरात ब्रिक्स देशांची परिषद पार पडणार आहे. डोकलामचा वाद मिटल्यावर मोदी पहिल्यांदाच चीनला गेले आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेतून काही फायदा होतो का ते आता पाहायचे आहे. याच कारणामुळे अमेरिकेचेही या बैठकीवर बारीक लक्ष असणार आहे.

‘ब्रिक्स’ परिषदेत प्लॅनरी सेशनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीनंर प्लॅनरी सेशन पार पडले होते. यात पंतप्रधान मोदींनी विविध मुद्दे मांडले.

 

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

  • शांतता आणि विकासासाठी एकमेकांमध्ये सहकार्याची आवश्यकता आहे.
  • ‘ब्रिक्स’ सहकार्यासाठी आधार बनली आहे. अनिश्चिततेकडे झुकणाऱ्या जगात स्थिरता आणि विकासासाठी ब्रिक्स महत्त्वाची ठरते आहे.
  • कृषी, संस्कृती, पर्यावरण, ऊर्जा, क्रीडा आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमधील आपण एकमेकांना सहकार्य करत आहोत.
  • ब्रिक्समधील देश एकमेकांना भेटत आहेत, ज्यामुळे आपल्याला समजून घेणं अधिक शक्य होणार आहे.
  • दारिद्र्य निर्मुलन, आरोग्य, स्वच्छता, कौशल्य, खाद्य सुरक्षा, लैंगिक समानता, ऊर्जा आणि शिक्षण यांबाबतची धोरणे ‘मिशन मोड’मध्ये आहेत.
  • महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमांमुळे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होते आहे.
  • केंद्रीय बँकांच्या क्षमतेत आणखी वाढ करावी लागेल. आयएमएफसोबतच्या सहकार्यास प्रोत्साहन द्यायला हवे असेही मत पंतप्रधानांनी मांडले आहे.
  • ब्रिक्स देश इंटरनॅशनल सोलर पॉवर कोएलेशनच्या माध्यमातून सौर उर्जेच्या ध्येयाला आणखी पुढे नेऊ शकतात.
  • ब्रिक्सने रेटिंग एजन्सी सुरु करण्याची गरज आहे. जेणेकरुन विकसित देशांच्या स्वायत्त आणि कॉर्पोरेट संस्थांच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येऊ शकतील.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number