‘पंतप्रधान मोदींना नोटीस बजावायला हवी होती’

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी सत्ताधर्यांना धारेवर धरत असलेले संजय यांनी आता पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. हक्कभंगाची नोटीस राहुल गांधींना का? सूडबुद्धीने बजावलेली नोटीस आहे. पण पंतप्रधान मोदी यांना नोटीस बजावायला हवी होती.पंप्रधानांनी जनतेच्या भावनांचा अनादर केला. ज्या पालिकांमध्ये आमच्या सत्ता होत्या, त्या पुन्हा आमच्याकडे येतील सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाला भाजपने विकत घेतले का? असा प्रश्न […]

‘पंतप्रधान मोदींना नोटीस बजावायला हवी होती’

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी सत्ताधर्यांना धारेवर धरत असलेले संजय यांनी आता पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. हक्कभंगाची नोटीस राहुल गांधींना का? सूडबुद्धीने बजावलेली नोटीस आहे. पण पंतप्रधान मोदी यांना नोटीस बजावायला हवी होती.पंप्रधानांनी जनतेच्या भावनांचा अनादर केला. ज्या पालिकांमध्ये आमच्या सत्ता होत्या, त्या पुन्हा आमच्याकडे येतील सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाला भाजपने विकत घेतले का? असा प्रश्न संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणी लोकसभा सचिवालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. त्याबाबत राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, “राहुल गांधी यांना नोटीस बजवण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यांनी लोकसभेत जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्या प्रश्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरं द्यायला हवी होती. मात्र, या प्रश्नांची उत्तरं न देता राहूल गांधींना नोटीस बजावण्यात आली. हक्कभंगाची कारवाई तर पंतप्रधान मोदींवर व्हायला हवी होती. मात्र, ती राहुल गांधींवर झाली. यालाच हुकूमशाही म्हणतात “

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number