पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या चार दिवसांपासून अमेरिका दौऱ्यावर होते. या चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी थेट इजिप्तला रवाना झाले आहेत. अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील भारतीयांशी संवाद साधला. याशिवाय भारतीय अमेरिकन उद्योगपतींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी व्हाइट हाउसने स्टेट डिनरचे आयोजन केले होते. यातही अनेक उद्योगपती, व्यावसायिक आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा संपल्यानंतर ट्विटरवर म्हटलं की, एक खूपच खास अमेरिका दौरा संपला. भारत अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध वाढवणाऱ्या अनेक कार्यक्रमात आणि संवादात भाग घेण्याची संधी मिळाली. देशात आणि जगात येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगलं वातावरण तयार करण्यासाठी काम करत राहू असंही मोदी म्हणाले. अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर जाणार आहेत.