पुढील निवडणुका स्वबळावरच लढणार – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई पालघर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवेसना भवनात पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी  भाजपाला खडे बोल सुनावले. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी पांडुरंग फुंडकरांना श्रद्धांजली वाहिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांचा अपमान केला असतानाही त्यांचा उमेदवार विजयी झाला याचं दुख: असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं. भाजपाला विजयासाठी काहीही […]

पुढील निवडणुका स्वबळावरच लढणार – उद्धव ठाकरे
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पालघर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवेसना भवनात पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी  भाजपाला खडे बोल सुनावले. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी पांडुरंग फुंडकरांना श्रद्धांजली वाहिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांचा अपमान केला असतानाही त्यांचा उमेदवार विजयी झाला याचं दुख: असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं. भाजपाला विजयासाठी काहीही करायचं आहे का असा प्रश्न पडतो असंही ते बोलले.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
  • पालघरच्या मतदारांना उद्धव ठाकरेंचे आश्वासन
  • ‘शिवसेना तुमच्या सोबत राहील’
  • ‘निवडणूक प्रचारात शिवसेनेने दिलेल्या शब्दापासून मागे जाणार नाही’
  • ‘जनतेच्या भावना जवळून पाहिल्या’
  • ‘साम-दाम-दंड-भेद वापरुन निसटला पराभव केला गेला’
  • ‘मी पराभव मानायला तयार नाही, पराभव जाहीर झाला’
  • ‘मतदान यंत्राबाबत धोरण आहे की नाही?’
  • उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला फोटो
  • ‘तोच’व्यक्ती भाजप उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत होता’
  • ‘पकडणारे कार्यकर्ते भाजपच्या नेत्यांचे नाव घेत होते’
  • ‘मतदानाच्या दरम्यान पैसे वाटताना काही जणांना पकडले’
  • ‘लाखभर मतं कशी वाढली, याचा पुरावा द्या’ उद्धव ठाकरेंची मागणी
  • ‘निवडणूक आयुक्तांची नेमणूक नको, निवडणूक हवी’
  • ‘सर्व पक्षांनी निवडणूक आयोगावर केस केली पाहिजे’
  • निवडणूक आयोगाची कराभाराची करुन दिली आठवण
  • ‘शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता’
  • ‘२०१९ मध्ये आयपीएल प्रमाणे निवडणूक घेणार का?’
  • ‘हवामानाचा अंदाज निवडणूक आयोगाला नव्हता का?
  • EVM मधील घोळावर उद्धव ठाकरेंची जोरदार टीका
  • ‘मुख्य निवडणूक आयुक्तांचा यंत्रणेवर ताबा आहे की नाही?’
  • उद्धव ठाकरेंचा भाजपला खणखणीत सवाल
  • ‘शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का?’
  • ‘शिवरायांच्या अपमानाबाबत भाजपकडून खुलासा नाही’
  • ‘जेमतेम काही हजारांनी भाजपचा विजय’
  • ‘घराघरामध्ये शिवसेना पोहचली’
  • ‘पालघरच्या जनतेला धन्यवाद, शिवसैनिकांना धन्यवाद’
  • ‘वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी शिवसेना ताकदीने लढली’
  • ‘पालघरची निवडणूक शिवसेनेने पहिल्यांदाच लढली’
  • उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
  • ‘सरकार चार वर्षातच खाली आले’
  • ‘२५ वर्ष सरकार जाणार नाही असे वातावरण होते’
  • ‘२०१४ च्या निवडणुकीनंतर देशात वेगळे वातावरण होते’
  • ‘११ पैकी २ जागा सोडल्या तर सर्वत्र भाजपचा पराभव’
  • ‘विजयी उमेदवारांचे अभिनंदन’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number