Amravati Crime: माणुसकीला काळिमा! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा अमानुष छळ; मारहाणीनंतर विवाहितेने गमावलं बाळ

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीमुळे गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Amravati Crime: माणुसकीला काळिमा! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा अमानुष छळ; मारहाणीनंतर विवाहितेने गमावलं बाळ

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे एका गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विवाहानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींकडून महिलेला हुंड्यासाठी सतत त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अतिरिक्त पैशांची मागणी करत महिलेला वारंवार मानसिक दबाव टाकला जात होता. एवढेच नव्हे तर किरकोळ कारणांवरून तिला मारहाणही केली जात असल्याचे समोर आले आहे.

पीडित महिला गर्भवती असतानाही तिच्याशी अमानुष वर्तन करण्यात आल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीत तिची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान महिलेचा गर्भपात झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत सविस्तर तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number