Raigad Fort Controversy: ‘जिथे हजारो मावळ्यांचं रक्त सांडलं…’; रायगडावरील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, शिवभक्तांमध्ये संतापाची लाट; नेमकं काय घडलं?

रायगड किल्ल्यावर शिवसमाधीस्थळी प्री-वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

Raigad Fort Controversy: ‘जिथे हजारो मावळ्यांचं रक्त सांडलं…’; रायगडावरील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, शिवभक्तांमध्ये संतापाची लाट; नेमकं काय घडलं?

Raigad Fort Controversy: किल्ले रायगडावर प्री-वेडिंग शूट केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसमाधीस्थळाजवळ शूट केल्याचा आरोप होत असून या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रायगड हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून तो महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक मानला जातो. येथे असलेली शिवसमाधी ही श्रद्धेचं केंद्र आहे. अशा पवित्र स्थळी प्री-वेडिंग शूटसारख्या कार्यक्रमांचं आयोजन केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका जोडप्याने समारंभपूर्व शूट केल्याचं दिसत असून, हे कृत्य अयोग्य असल्याचं मत मोठ्या प्रमाणात मांडलं जात आहे.

सोशल मीडियावर शिवप्रेमींनी या प्रकाराचा निषेध करत केंद्रिय पुरातत्व विभागाने अशा प्रकारांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी केली आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी अशा प्रकारचे शूटिंग होऊ नये, यासाठी स्पष्ट नियमावली असावी, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: IPL 2026: Viral Video: सामन्यापेक्षा जास्त व्हायरल ‘रो-को’ मोमेंट! रोहितने दिली रनआऊटची धमकी, कोहलीची रिअ‍ॅक्शन पाहा

या प्रकरणावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. काहींनी सांगितलं की, समाधीस्थळावर फक्त आशीर्वाद घ्यावेत, हीच परंपरा आहे. लग्नाचं पहिलं आमंत्रण राजांना देण्याची भावना प्रत्येक शिवभक्ताची असली, तरी त्याचा अतिरेक होऊ नये. प्री-वेडिंग शूटसाठी अशा पवित्र स्थळांचा वापर करणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

तर काहींनी प्री-वेडिंगच्या नावाखाली मंदिरं आणि ऐतिहासिक वास्तूंचा होणारा वापर थांबवण्याची गरज व्यक्त केली. आपल्या पूर्वजांनी या वास्तू अशा गोष्टींसाठी जपून ठेवल्या नाहीत, त्यामुळे त्यांचा आदर राखणं गरजेचं असल्याचंही मत मांडलं जात आहे.

हेही वाचा: Asha Bhosle: महापौरांचा बेजबाबदारपणा! आशा भोसले यांना श्रद्धांजली देताना हसल्या अन् नावाचाही केला चुकीचा उच्चार; व्हिडिओ व्हायरल

काही नेटकऱ्यांनी व्हिडिओ काढणाऱ्यांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. फक्त व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकण्यापेक्षा संबंधितांना थांबवणं अधिक महत्त्वाचं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. काहींनी तर या प्रकाराला “फक्त रीलसाठी केलेला दिखावा” असं संबोधलं आहे.

 या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे. रायगडासारख्या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळाची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number