प्रवीण तोगडियांचे तांडव; “माझा एन्काऊंटर करण्याचा डाव” – तोगडियांचा आरोप

वृत्तसंस्था, अहमदाबाद विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यांच्यावर अहमदाबादच्या चंद्रमणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. प्रवीण तोगडिया पोलिसांच्या अटकेत असताना बेपत्ता झाल्याचा खळबळजनक आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. एका जुन्या प्रकरणात राजस्थान पोलिसांचे पथक […]

प्रवीण तोगडियांचे तांडव; “माझा एन्काऊंटर करण्याचा डाव” – तोगडियांचा आरोप

वृत्तसंस्था, अहमदाबाद

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यांच्यावर अहमदाबादच्या चंद्रमणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. प्रवीण तोगडिया पोलिसांच्या अटकेत असताना बेपत्ता झाल्याचा खळबळजनक आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

एका जुन्या प्रकरणात राजस्थान पोलिसांचे पथक तोगडिया यांना अटक करायला सोमवारी अहमदाबादमध्ये आले होते. त्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेने प्रवीण तोगडिया बेपत्ता असल्याचे सांगितेले होते. मात्र, ते बेशुद्धावस्थेत एका उद्यानात सापडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या एन्काऊंटरचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. त्यावेळी पत्रकार परिषदेतच त्यांना रडू कोसळले.

 

पत्रकार परिषदेत काय म्हणाले, विहिंपचे प्रवीण तोगडिया

> काही काळापासून माझा आवाज दाबण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे. 
> मी हिंदू ऐक्यासाठी लढत आहे. 
> देशभरात माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुने खटले काढून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
> मला अटक करून एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात पाठवण्याचे काम गुजरातमधून सुरू झाले. 
> मकरसंक्रांतीच्या दिवशी राजस्थान पोलिसांचे पथक अजामीनपात्र वॉरंट घेऊन मला अटक करण्यासाठी आले. 
> हा माझा आवाज दाबण्याचा प्रय्तन आहे. त्या परिस्थितीतही मी हिंदु संघटनेचे काम करत राहिली. 
> मी मुंबईत एका कार्यक्रमातून एका कार्यक्रमातून रात्री 1 ते 1.30 दरम्यान पोहोचलो. पोलिसांनी मी रात्री 2.30 वाजता यायला सांगितले. सकाळी मी पुजा करत असताना एक व्यक्ती माझ्या घरात आला. त्याने सांगितले लगेचच इथून निघा तुमच्या एन्काऊंटरसाठी लोक निघाले आहेत.

> मी मृत्यूला घाबरत नाही. त्यामुळे मी त्याचे ऐकले नाही. बाहेर दोन पोलिस होते. तेवढ्यात मला एक फोन आला. त्यावर राजस्थान पोलिसांचा ताफा गुजरात पोलिसांच्या मदतीने येत असल्याचे मला कळले.

> मला वाटले काही झाले तर माझे जे व्हायचे ते होईल, पण देशभरातील वातावर चिघळेल. लगेच मी आता घातलेले कपडे घातले आणि पैशाचे पाकीट घेऊन निघालो. पोलिसांना सांगून मी सोबत काही कार्यकर्त्यांना घेऊन रिक्षामध्ये निघालो. 
> रस्त्यात मी राजस्थानच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना संपर्क केला त्यांनी कोणतेही पथक निघाले नसल्याचे सांगितले. मी त्यानंतर लगेच लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून सगळे फोन स्विच ऑफ केले.

> एका घरात जाऊन मी वकिलांना आणि तज्ज्ञांना संपर्क केले तेव्हा त्यांनी जयपूरमध्ये न्यायालयासमोर शरणागती पत्कारण्याचा सल्ला दिला.

> जयपूरला जाण्यासाठी मी रिक्षाने एअरपोर्टकडे निघालो, पण मला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला त्यानंतर मी बेशुद्ध झालो, नंतर काय झाले मला काहीही कळले नाही.

> रात्री 12 च्या दरम्यान मी शुद्धीत आलो, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये असल्याचे माझ्या लक्षात आले.

> मी गुन्हेगार नाही, पण माझ्या घराच्या, कार्यालयाच्या तपासणीचे प्रयत्न का केले जात आहेत. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number