प्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना!

भाजपवर नाराज असलेले आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष नेते प्रवीण तोगडिया यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. ‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’ असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. पक्ष स्थापनेची घोषणा करतानाच लोकसभा निवडणुका लढवण्याची आणि सरकार येताच तीन महिन्यांत राम मंदिर बांधण्याची घोषणाही त्यांनी केली. प्रवीण तोगडिया यांनी या आधीच देशात हिंदू सरकार असावं असं स्पष्ट […]

प्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना!

भाजपवर नाराज असलेले आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष नेते प्रवीण तोगडिया यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. ‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’ असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. पक्ष स्थापनेची घोषणा करतानाच लोकसभा निवडणुका लढवण्याची आणि सरकार येताच तीन महिन्यांत राम मंदिर बांधण्याची घोषणाही त्यांनी केली.

प्रवीण तोगडिया यांनी या आधीच देशात हिंदू सरकार असावं असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे ते राजकारणात उतरण्याचे कयास वर्तवले जात होते. आज त्यांनी अयोध्या दौऱ्यावर असताना पक्ष स्थापन केल्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे (एएचपी) शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार दिले जातील. तसेच सरकार येताच अल्पसंख्याकांची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कायदा केला जाईल, असे सांगतानाच या नव्या राजकीय पक्षात सामिल होण्याचं आवाहनही त्यांनी हिंदू संघटनांना केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number