दरेकरांना अटक होऊन तत्काळ जामीन

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबै बॅंककेतील बोगस मजूर प्रवर्ग प्रकरणी चौकशी झाली. माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकात दरेकरांची चौकशी झाली असून याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. मात्र, या गुन्ह्याप्रकरणी दरेकरांना दिलासा मिळाला आहे. दरेकरांना अटक होऊन तत्काळ जामिन मिळाला आहे. ३५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दरेकरांना जामीन मिळाला आहे. यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना […]

दरेकरांना अटक होऊन तत्काळ जामीन

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबै बॅंककेतील बोगस मजूर प्रवर्ग प्रकरणी चौकशी झाली. माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकात दरेकरांची चौकशी झाली असून याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. मात्र, या गुन्ह्याप्रकरणी दरेकरांना दिलासा मिळाला आहे. दरेकरांना अटक होऊन तत्काळ जामिन मिळाला आहे. ३५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दरेकरांना जामीन मिळाला आहे.

यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकार निशाणा साधला. सरकारने राजकारण करत सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई केली आहे. तसेच न्यायालयाकडून मला दिलासा मिळाला आहे. फक्त कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असल्याचे दरेकरांनी सांगितले आहे.

मुंबा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी २० वर्ष सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकरांवर करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीच्यावतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांची बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मात्र, सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून त्यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे मुंबै बँक घोटाळाप्रकरणी प्रवीण दरेकर यांची पोलिसांकडून चौकशी झाली. तसेच दरेकरांनीही त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले असून त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचे ते म्हणाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number