Pratap Sarnaik: एसटी तिकट दरवाढीबद्दल प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, ‘…तर आम्हाला दरवाढ…’

या सर्व प्रश्नांची उत्तरं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहेत. 

Pratap Sarnaik: एसटी तिकट दरवाढीबद्दल प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, ‘…तर आम्हाला दरवाढ…’

आखाती देशातील युद्धाचा फटका आता संपूर्ण जगाला बसायला लागला आहे. देशावर आता महागाईचं संकट आले आहे. सीएनजी, सोने-चांदी, त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या दरातही मोठी दरवाढ झालेली आहे. डिझेल दरवाढीचा फटका आता एसटी मंहामंडळाला बसत आहे. त्यामुळे तिकिट दरवाढ होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहेत. 

प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत सध्याच्या परिस्थिती आणि तिकिट दरवाढीबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले की, एसटीला 10 लाख 87 हजार लिटर डिझेल लागतं. सध्या इंडियन ऑईलकडून डिझेल पुरवठा होतं आहे. मागील आठवड्यात ३ रुपये दर वाढवला आहे. या दरवाढीमुळे 33 लाख 70 हजार आम्हाला जास्त मोजावे लागत आहेत.  यामुळे महामंडळाचा वर्षाला124 कोटींचा तोटा होत आहे. जागतिक पातळीवर युद्धाचा भडका उडाल्यास आणखी परिणाम होईल. 

हेही वाचा – Dagdusheth Ganpati A-Class Tourism: पुण्याचे वैभव असलेल्या ‘दगडूशेठ गणपती’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; फडणवीसांची ऐतिहासिक घोषणा 

भविष्यात काय होईल?  हे आता सांगता येत नाही. विशेष सवलत देण्याचा निर्णय झाल्यास आम्ही दरवाढ करणार नाही. उद्या कॅबिनेट आहे मुख्यमंत्री असतील तेव्हा त्यांना पत्र देणार आहेत. मे पर्यंत आम्ही थांबणार आहोत. पुढील 10 ते 12 दिवस केंद्र आणि राज्यसरकारनं पुर्तता केली तर दरवाढ करणार नाही. मात्र न झाल्यास दरवाढ करावी लागेल. ऑईल कंपनीने पूर्व किंमतीत मिळालं तर दरवाढ करणार नाही. इंधनवाढ झाली तर आम्हाला दरवाढ करावी लागेल. ज्या घटकांना सवलती दिल्या आहेत त्या लागू राहतील.

बाईट टॅक्सीबाबत मी सायबर पोलिसांना पत्र देऊन अनधिकृत रित्या चालू आहेत. काही अनधिकृत रित्या पेट्रोलबाईक सुरू होत्या. काही ठिकाणी महिलांबरोबर गैरप्रकार घडले होते. अनेक नियम पायदळी तुडवले जात होत्या. कंपन्यांनी नियम पायदळी तुडवले त्यामुळे ही भूमिका घेतली. 15 तारखेला गुगलला पत्र दिलं त्यानंतर त्यांनी ओला उबेरच्या सरसकट गाड्यांवर बंदी घातली. त्यामुळे तो घोळ झाला, त्यात फक्त अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाई केली जाईल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number