प्रसादच्या पोस्टने दिली ‘धर्मवीर २’ ची चाहूल

मुंबई, १३ मे २०२३, प्रतिनिधी : गेल्या वर्षी सुपरहिट झालेला धर्मवीर हा चित्रपट आठवतोय का? ठाण्यातील आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये अनेक विक्रम मोडले. १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने चित्रपटाचा मुख्य नायक अर्थात प्रसाद ओक याने एक खास पोस्ट सामायिक आहे. […]

प्रसादच्या पोस्टने दिली ‘धर्मवीर २’ ची चाहूल

मुंबई, १३ मे २०२३, प्रतिनिधी : गेल्या वर्षी सुपरहिट झालेला धर्मवीर हा चित्रपट आठवतोय का? ठाण्यातील आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये अनेक विक्रम मोडले. १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने चित्रपटाचा मुख्य नायक अर्थात प्रसाद ओक याने एक खास पोस्ट सामायिक आहे.


धर्मवीर चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओक याने ”धर्मवीर”मधील आनंद दिघे यांच्या भूमिकेतील एक खास पोस्टर आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर सामायिक केले आहे. विशेष म्हणजे या पोस्टर खाली त्याने “धर्मवीर” माझ्या आयुष्यातल्या या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण झालं…!!” या भूमिकेनी, या चित्रपटानी मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे. पुन्हा एकदा प्रविण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, मा. खा. श्रीकांत जी शिंदे आणि मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि धर्मवीर च्या संपूर्ण टीम चे अत्यंत मनःपूर्वक आभार…!!!” असे लिहिले आहे.

यानंतर पुढे त्याने लिहिले की,”रसिक प्रेक्षकांचे सुद्धा शतशः आभार…!!! धर्मवीर – भाग 2 ला सुद्धा आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरून मिळेल अशी आशा करतो…!!! “दिघे साहेब”… असेच कायम पाठीशी रहा”. हे पाहून आता धर्मवीर २ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी चाहूल लागली आहे. नेटकरी आता या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी आतुर झालेत तर प्रसादच्या या खास पोस्टखाली कंमेंट्सचा वर्षाव होऊ लागला आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number