Prasad Vedpathak Video: "हा माझा शेवटचा व्हिडीओ…" पांढरी पट्टीच्या वादामुळे प्रसाद वेदपाठकवर आली भयंकर वेळ

पांढऱ्या पट्टीच्या मुद्द्यावरून प्रसादने रडत हात जोडत एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्रसादने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Prasad Vedpathak Video: &quotहा माझा शेवटचा व्हिडीओ…&quot पांढरी पट्टीच्या वादामुळे प्रसाद वेदपाठकवर आली भयंकर वेळ

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी त्यांच्या इमारतीसमोरील पांढऱ्या पट्टीवर आक्षेप घेत व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. प्रसाद वेदपाठक या सोशल इंफ्ल्यूनसर ने त्यांच्या सोसायटीत व्हाईट पट्टा मारल्यावरून नाराजी व्यक्त केली होती. हा पट्टा हटवावा म्हणून आवाज उचलला होता. तसेच त्याच्या सोसायटीत मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा त्याने केलेला. त्याच्या या पोस्टनंतर जैन कुटुंबीयांनी ती पट्टी हटवली.

त्यानंतर प्रसाद वेदपाठकने माझ्यासाठी हा विषय संपला, अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या घडामोडीनंतर निर्माण झालेला वाद आता मिटण्याची शक्यता वर्तावण्यात आली होती. मात्र त्यानंतरच खऱ्या अर्थानं या प्रकरणाला धार्मिक आणि राजकीय रंग चढला आहे. प्रसादने रडत हात जोडत एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्रसादने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तो म्हणाला की, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातायत, त्याच्यासोबत काहीही होऊ शकतं, त्याचं काहीही बरं-वाईट होऊ शकतं, तसेच ज्यात हा आपला शेवटचा व्हिडीओ ठरू शकतो, असं सांगत मदत मागितली आहे.

हेही वाचा- Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या फुटीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीतही बंडाचा झेंडा? सुनेत्रा पवारांनी घेतली अमित शाहांची भेट; कारण काय?

प्रसाद व्हिडीओत म्हणाला, “नमस्कार, मंडळी आमच्या सोसायटीमध्ये जो पांढऱ्या पट्टीचा वाद झालाय, त्यानंतर पूर्ण आयु्ष्य आमचं बदललंय. 4 तारखेला वाद झाला, 8 तारखेला त्यांना आम्ही भेटलो, 9 तारखेला ती पट्टी ज्यांनी मारलेली त्यांनी हटवली… त्यानंतर 11 तारखेला आमच्या इथले नगरसेवक प्रवीण छेडा यांनी पोलिसांना एक लेटर दिलं आणि माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली… या सर्व घडामोडींमध्ये बरीच लोक आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत… पाठलाग केला जातोय, घरी माणसंही आलेली, आमच्यावर दबाव आणण्यासाठी, धमकावण्यासाठी… या सर्व गोष्टींचे साक्षीदार माझे आई-वडील, माझे सासरे, माझा भाऊ, माझी बायको दीपिका हे आहेत…” 

“मी तुम्हाला आता हे सर्व सांगतोय कारण मला माहीत नाही की, माझं काय होईल पुढे…. माझ्यावर सर्व बाजूंनी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, मला अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय… मला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट किंवा असं काही मिळत नाहीये, फक्त मनसेनंच मला पूर्ण पाठिंबा दिलाय. राजसाहेब, अविनाश दादा, संदीप सर… प्लीज जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, यांनी मला अडकवलं, तुम्हाला सगळं खरं, सत्य माहितीये, हा वाद पांढऱ्या पट्टीपासून सुरू झाला आणि आता याला भलतीच दिशा दिली जातेय… माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकतो…”

हेही वाचा- Shivsena Opration Tiger : एकीकडे ठाकरेंची मनधरणीची रणनीती, तर दुसरीकडे शिंदेंचा 6 खासदारांना कॉन्फरन्स कॉल; 30 मिनिटांच्या चर्चेत काय झालं?

“मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करतोय की, प्लीज सर हे खूपच चुकीचं सुरूये, प्लीज माझ्याबाबत जाणून घ्या, मी काय आहे, मी कसे माझे फॉलोअर्स कमावलेत, माझे लोक मला काय मानतात, मी देशासाठी काय करतोय, प्लीज हे जाणून घ्या. कारण या गोष्टींची पूर्ण तपासणी करा. कारण बऱ्याच लोकांची मनं दुखलीत, बऱ्याच खोट्या गोष्टी माझ्याविरोधात स्प्रेड केल्या गेल्यात, अशा गोष्टी ज्या मी बोललोच नाहीय, त्यामुळे एक निगेटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झालंय, सगळे नुसते माझ्या जीवावर उठलेत, त्यामुळे मी एक अपील करतोय की, माझा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, माझा माणुसकीवर पूर्ण विश्वास आहे, माझा माझ्या लोकांवर पूर्ण विश्वास आहे, पण त्यासोबतच एक यंत्रणा माझ्या पूर्णपणे मागे लागलीय, कदाचित हा माझा शेवटचा व्हिडीओ असेल, मला नाही माहीत, पुढे काय होणार आहे ते, मला माझे कॉन्टॅक्ट्स आहे, त्यांच्याकडून कळलंय की, माझ्याविरोधात आधीच गुन्हा दाखल झालाय, तो भलत्याच व्यक्तीनं भलत्याच संदर्भात केलाय, त्या जिहादी वैगरे शब्दही टाकले गेलेत, जे शब्द आलेले प्रवीण छेडाच्या तोंडून…”

“प्लीज हे सगळं नका करू तुम्ही, आमच्याच जमिनीवर आम्हाला दाबलं, मी त्याच्याविरोधात आवाज उठवला, आता पूर्णपणे मला त्रास दिला जातोय, I don’t deserve this… We deserve Justis… प्लीज आम्हाला मदत करा… अकाउंट सस्पेंड केले जातात, मास रिपोर्टटिंग केली जातेय, मी सगळ्यांकडून मदतीची याचना करतोय, आता या क्षणी आम्हाला फक्त मदतीची गरज आहे, खूप चुकीचं होतंय, मला माझ्या कुटुंबाची चिंता आहे, मी माझ्या कुटुंबाचा मुख्य माणूस आहे, यांनी मला जर अटक केली, तर सगळं उध्वस्त होईल… मी कर्ता आहे घराचा आणि मी कधीच आयुष्यात चुकीचं काम केलेलं नाही, मी चुकीची कामं नाही करू शकत, खोट्या FIR, खोट्या NC नाही करू शकत… प्लीज समजून घ्या… ज्यांनी रेघ मारली तो चुकीचा की, जो आवाज उठवतोय तो चुकीचा…? एवढी साधी गोष्ट आहे…”, असं प्रसाद वेदपाठक म्हणालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number