जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विधान परिषद निवडणुकीत भाजपला विजयाचा ‘प्रसाद’ मिळाला आहे.
विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा अपेक्षेप्रमाणे विजयी झाला आहे.
लाड यांना 209 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला. माने यांना 73 मतं मिळाली आहेत.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठी निवडणूक पार पडली.