विठ्ठलाच्या भक्तांसाठी बुंदी आणि राजगिऱ्याच्या लाडवांचा प्रसाद

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडूचा प्रसाद तयार येत आहे.

विठ्ठलाच्या भक्तांसाठी बुंदी आणि राजगिऱ्याच्या लाडवांचा प्रसाद

पंढरपूर : कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडूचा प्रसाद तयार करण्यात येत असून आठ लाख लाडू बनविण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल, या दृष्टीने ८ लाख बुंदी लाडू प्रसाद व ५० हजार राजगिरा लाडू प्रसाद तयार करण्यात येत आहे. ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकीट २० रुपये प्रमाणे व दोन राजगिरा लाडू १० रुपयेप्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी एकूण तीन स्टॉल असून, सर्व स्टॉल २४ तास खुले ठेवण्यात येत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number