नुकताच 'बिग बॉस 19 ' शोमध्ये सहभागी झालेला स्पर्धक आणि स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे त्यांच्या वादग्रस्त आणि डार्क कॉमेडीमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याच्या शोमध्ये झालेली डार्क कॉमेडी त्याला स्वतःलाच महागात पडली आहे. कॉमेडियन प्रणित मोरे यांनी, त्यांच्या स्टँड-अप शोमधील एका व्हायरल झालेल्या प्रेक्षक क्लिपमुळे त्याच्यावर झालेल्या टीकेनंतर आपले इंस्टाग्राम अकाउंट डीअॅक्टिव्हेट केले आहे.
रविवारी त्याच्या एका लाईव्ह शोमध्ये गुरुग्रामस्थित प्रेक्षक हिमांशू जांगरा याने एक विधान केलं, ज्यात त्याने 370 रुपयांच्या बिर्याणीवरून अत्यंत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील वक्तव्य केलं. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये जांगरा असा दावा करताना दिसला की, बिर्याणी डेटवर 370 रुपये खर्च केल्यामुळे त्याला बदल्यात त्याच्या जोडीदाराकडून काहीतरी मिळण्याचा हक्क आहे, ज्यामुळे सोशल प्लॅटफॉर्मवर तीव्र प्रतिक्रिया आणि व्यापक चर्चा सुरू झाली.
यावर प्रणित हसताना आणि त्याची खिल्ली उडवताना दिसला. त्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. हे ट्रोलिंग शेवटी एवढं वाढलं की, त्याला सोशल मीडियावर माफी मागावी लागली. त्याच्या माफीनाम्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावर सगळ सावरलं नाही. माफीनाम्यानंतर देखील प्रणित मोरेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.
या टीकेनंतर प्रणित मोरेने आपले इंस्टाग्राम अकाउंट निष्क्रिय केल्याचे वृत्त आहे. त्यांच्या प्रोफाइलवर शोध घेतल्यास सध्या शून्य फॉलोअर्स आणि शून्य फॉलोइंग दिसत आहे, ज्यामुळे हे अकाउंट तात्पुरते निष्क्रिय किंवा बंद करण्यात आले असावे अशी अटकळ बांधली जात आहे. सोशल मीडिया वापरकर्ते यावर तीव्र प्रतिक्रिया देत असून, या प्रकरणामुळे ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.