राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप….

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप होत आहे. प्रणव मुखर्जी यांचं भाषण – इंग्रजांनी केंद्रीय राज्यकारभार पद्धत या देशात आणली 2500 हल्यांच्या वर्षांच्या इतिहासात 5000 हजार वर्षांची संस्कृती या देशात कायम राहिली अनेक लोकांनी देशाला तोडण्याचा प्रयत्न केला, मुगल पासून इंग्रजांपर्यंत प्रयत्न झाले पण […]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप….

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप होत आहे.

प्रणव मुखर्जी यांचं भाषण –
  • इंग्रजांनी केंद्रीय राज्यकारभार पद्धत या देशात आणली
  • 2500 हल्यांच्या वर्षांच्या इतिहासात 5000 हजार वर्षांची संस्कृती या देशात कायम राहिली
  • अनेक लोकांनी देशाला तोडण्याचा प्रयत्न केला, मुगल पासून इंग्रजांपर्यंत प्रयत्न झाले पण ते यशस्वी झाले नाही
  • गांधी आणि नेहरू यांनी सर्व धर्म समभावातूनच राष्ट्रप्रेमाचे धडे दिले
  • न्याय, बंधुता आणि समता यावर आधारलेली घटना हीच आपली ताकद
  • मी इथे माझ्या भावना आणि ध्येय दिशा मांडण्यासाठी आलो – मुखर्जी
  • मी राष्ट्रवाद, देशहित आणि भारताचेच संदर्भात बोलील
  • 800 वर्षापुर्वी आपल्याकडे तक्षशिला,नालंदा सारखे विद्यापीठ होते.
  • भारताचा गौरवशाली इतिहास हा शैक्षणिक आणि ज्ञानाचा खजिना आहे

संघाच्या परंपरेला अनुसरुनच प्रणव मुखर्जींसारख्या सदगृहस्थांना निमंत्रण, देशभरातील चर्चा निरर्थक : मोहन भागवत

दरवर्षी देशातील सदगृहस्थांना संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमाला निमंत्रण : मोहन भागवत

यंदा संघाच्या कार्यक्रमात बदल, सरसंघचालक शेवटी बोलत असत पण यंदा सरसंघचालक पाहिले तर मुख्यातिथी नंतर बोलणार

प्रणव मुखर्जी ज्ञान समृद्ध आदरणीय व्यक्तिमत्व आहेत, आम्ही सहजतेने त्यांना निमंत्रण दिले त्यांनी स्वीकारलं, त्यांना का बोलावलं ते का आले ह्या चर्चा निर्थक आहे – मोहन भागवत

संघ सर्व समाजाला संघटीत करू इच्छितो, एक भारतीयाला दुसरा भारतीय परका नाही – मोहन भागवत

कॉग्रेसने ट्वीट करुन संघावर केली टीका

अपडेट –

  • सगळ्यांचे पूर्वज एकच आहेत हे वास्तव स्वीकारणे गरजेचे आहे.
  • भारतमाता ही सगळ्यांचीच माता आहे
  • हिंदू समाजाला संघटित करण्यासाठीच संघाची स्थापना करण्यात आली
  • हिंदू समाज हा भारताचा उत्तराधिकारी असलेला समाज आहे
  • मोहन भागवत यांनी सांगितल्या हेडगेवार यांच्या आठवणी
  • आपला देश विविधतेने नटलेला, तरीही प्रत्येकाचे लक्ष्य एकतेचेच आहे
  • देशाचे भाग्य बदलणे हे प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हातात
  • भारताचे भाग्य बदलणे हे संघाचेच नाही तर देशातल्या अनेकांचे ध्येय
  • प्रणव मुखर्जी आणि संघाची विचारधारा वेगवेगळी
  • प्रणव मुखर्जी हे ज्ञानी आणि आदरणीय व्यक्तीमत्त्व
  • विचारांचे आदानप्रदान व्हावे म्हणून मुखर्जी यांना निमंत्रण
  • प्रणव मुखर्जींना निमंत्रण दिल्यावरच चर्चा जास्त झाली
  • समाज संघटित करणे हा संघाचा मुख्य उद्देश
  • सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण सुरु
  • भगव्या ध्वजाचं अवरोहण झाले असून संघाची प्रार्थना सुरू झाली आहे.
  • मुखर्जी व भागवत घटनास्थळी पोचले आहेत.
  • शेवटी मुखर्जी स्वयंसेवकांना संबोधित करतील आणि आपली भूमिकाही स्पष्ट करतील.
  • स्वयंसेवकांचं संचलन व प्रात्यक्षिक मुखर्जींसमोर होईल असं सांगण्यात येत आहे.
  • सुमारे 600 स्वयंसेवकांनी तृतीय वर्ष शिक्षा कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.
  • रेशीमबागेत संघ स्वयंसेवक येण्यास सुरुवात झाली आहे.
  • भागवतांनी मुखर्जींना स्वत: सर्व घर दाखवले आणि त्याची माहिती दिली.
  • हेडगेवार हे भारतमातेचे सुपुत्र असल्याची स्मृती मंदिर येथील वहीत प्रणवदांकडून नोंद
  • ५ वाजण्याच्या सुमारास प्रणव मुखर्जी यांची नागपूर येथील स्मृती मंदिरात हजेरी
  • सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून प्रणव मुखर्जी यांचे स्वागत
  • काँग्रेसमधून होणारा विरोध झुगारून प्रणव मुखर्जी नागपुरात संघाच्या कार्यक्रमासाठी हजर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number