विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अनेक दिग्गज नेते सभा घेत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगलीत सभा घेतली आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे चांगलेच कौतुक केले आहे.
नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आणा असे आवाहन त्यांनी केले आहे.
भाजपा उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभांचा धडाका लावत भाजपाच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रात फडणवीस सरकारने केलेल्या पाच वर्षांच्या कामगिरीचे कौतुक करीत महाराष्ट्र पाच वर्षात झालेला विकास हा कित्येक वर्षानंतर झाल्याचे सांगितले.
तसेच महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर येईल आणि मी फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईत येईन असे ही ते सभेत म्हणाले आहेत.
महाराष्ट्राची जनता 27 तारखेची दिवाळी 24 तारखेला साजरी करेल, असा विश्वासही डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.