वृत्तसंस्था, मैसुर
सिंघम चित्रपटातील गाजलेला व्हिलन, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी भाजप खासदार प्रताप सिन्हांवर मानहानीचा खटला दाखल केला असून हा दावा केवळ एक रुपयाचा आहे. आपली बदनामी केल्याचा आरोप करत प्रकाश राज यांनी प्रताप सिन्हा यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय.
कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचा खटला दाखल केल्याची माहिती प्रकाश राज यांचे वकील एम. महादेव स्वामी यांनी दिलीय. 3 मार्च रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. प्रकाश सिन्हांनी ऑक्टोबर 2017 मध्ये सोशल मीडियावर प्रकाश राज यांच्याशी संबंधित काही पोस्ट लिहिल्या होत्या. या पोस्ट अपमानकारक असल्याचं सांगत प्रकाश राज यांनी नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितलं होतं. खासदार सिन्हांनी नोटीसला काहीच उत्तर न दिल्यामुळे नाईलाजास्तव प्रकाश यांना कोर्टाची पायरी चढावी लागत आहे.