जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
चार्ल्स डार्विन यांचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत खोटा असल्याचे सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सेमिनार आयोजित करण्याचा कोणताही विचार नाही, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. डार्विन यांचा उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी गेल्या आठवड्यात औरंगाबादेत केला होता.
यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देतांना जावडेकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली. तसेच, आपण अशी वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्लाही सत्यपाल सिंह यांना दिल्याचे जावडेकर यांनी सांगितले.