Homeमहाराष्ट्र प्रकाश जावडेकरांच्या हटके स्मार्टफोनने वेधले सगळ्यांचेच लक्ष
प्रकाश जावडेकरांच्या हटके स्मार्टफोनने वेधले सगळ्यांचेच लक्ष
वृत्तसंस्था, नवी दिल्ली संसदेच्या आवारात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हटके स्मार्टफोननं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. एका हातात लाल रंगाचा मोबाइल आणि एका हातात जांभळ्या रंगाचा लँडलाइन-रिसिव्हर घेऊन जावडेकर संसदेबाहेर आले. तर, मोबाइलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींपासून वाचण्यासाठीच जावडेकरांनी ही शक्कल लढवल्याचं बोललं जातंय.