वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विधानभवनावर मोर्चा काढल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मुंबईत राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तसेच आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. तसेच अधिवेशन सुरू असल्यामुळे नजीकच्या परिसरात जमावबंदी सुरू आहे. दरमयान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ओबीसी आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. त्यामुळे पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतले आहे.
राज्य सरकार ओबीसींविरोधात असल्याचा आरोप करत आता आंदोलन गाव पातळीवर नेण्यात येईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. तसेच राजकीय आरक्षणासह जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.