‘मी आधार कार्ड काढले नाही आणि आयुष्यभर काढणार नाही’ – प्रकाश आंबेडकर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई देशातील नऊ न्यायाधीशांनी आधार कार्ड हे ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केलंय. तरीही केंद्र सरकार आधार कार्डची सक्ती अमेरिकेच्या दबावामुळे आणत आहे का असा प्रश्न भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ‘मी आधार कार्ड काढले नाही आणि आयुष्यभर काढणार नाही’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना […]

‘मी आधार कार्ड काढले नाही आणि आयुष्यभर काढणार नाही’ – प्रकाश आंबेडकर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

देशातील नऊ न्यायाधीशांनी आधार कार्ड हे ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केलंय. तरीही केंद्र सरकार आधार कार्डची सक्ती अमेरिकेच्या दबावामुळे आणत आहे का असा प्रश्न भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ‘मी आधार कार्ड काढले नाही आणि आयुष्यभर काढणार नाही’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन फार्म भरले अशा सर्व शेतकऱ्यांसाठी भारिप राज्यभर मोर्चे काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number