औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली. या सभेला प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील, वारीस पठाण हे नेते उपस्थित होते.
सगळा देश दुहीच्या उंबरठ्यावर आहे, ही परिस्थिती अंत्यंत भयंकर आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
द्वेषाच्या राजकारणाला मूठमाती दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.
देशाची परिस्थिती अत्यंत भयानक आहे, या देशांमध्ये मुसलमानाना सांगितले जाते की तुम्ही देश सोडा, हे सांगणारे तुम्ही कोण हे तर सांगा? 2019 ला पुन्हा निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये तुम्हाला आपटल्याशिवाय राहणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
- आज सगळा देश दुहीच्या उंबरठ्यावर आहे.
- आज काय केलं जातंय ओबीसींची संख्या लहान आहे निवडून येऊ नये म्हणून अशी व्यवस्था केली जात आहे.
- ज्यांनी ही निवडणूक पद्धत बदलण्याचे ठरवले आहे.
- मी ओबीसींना आव्हान करतो 2019 निवडणुकीत यांना बाहेर पाठवा.
- तुम्ही नीट वागला नाहीतर तुम्हाला साकगडी केल्याशिवाय राहणार नाही.
- आमची सत्ता आल्यानंतर तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.
- द्वेषाच्या राजकारणाला आपण मूठमाती दिली पाहिजे.
- सनातनाच्या कारवाई काही दिसत नाहीत.
- शांतता राहिली पाहिजे हे लक्षात घ्या, दुसऱ्या बाजूने अशांतता निर्माण करतील.
- पंतप्रधान स्वतः खात नाहीत, दुसऱ्याला खायला देतात आणि त्यातील वाटा मागतात.