प्रज्ञानानंदने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदची भेट घेतली. या भेटीचे फोटो ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदनेच सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. यावेळी प्रज्ञानानंदचे आई-वडीलही त्याच्या सोबत होते. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. अंतिम सामन्यात प्रज्ञाननंदला अव्वल प्रतिस्पर्धी मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावं लागलं. तरीही वयाच्या १८ व्या वर्षी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत […]

प्रज्ञानानंदने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदची भेट घेतली. या भेटीचे फोटो ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदनेच सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. यावेळी प्रज्ञानानंदचे आई-वडीलही त्याच्या सोबत होते. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.


अंतिम सामन्यात प्रज्ञाननंदला अव्वल प्रतिस्पर्धी मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावं लागलं. तरीही वयाच्या १८ व्या वर्षी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदापर्यंत मजल मारण्याची ऐतिहासिक कामगिरी प्रज्ञानंदने केली आहे. बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदने रौप्यपदक पटकावल्यानंतर देसभरात त्याच्या यशाचे कौतुक झालं.


‘भारतातील युवापिढी कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, हे तुझ्या उदाहरणावरून दिसून येते. तुझा अभिमान वाटतो!”, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कुटुंबासह त्यांना भेटणे हा मोठा सन्मान होता. मला आणि माझ्या पालकांना त्यांच्यासोबतच्या या भेटीने नवी उमेद मिळाली आहे, अशा शब्दात प्रज्ञानानंदने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


बुद्धिबळ विश्वचषक उपविजेत्या आर प्रज्ञानानंदच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारा आर प्रज्ञानानंद हा सर्वात तरुण खेळाडू आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी जिंकता आली नसली तरी त्याने भारतीयांची मने नक्कीच जिंकली. प्रज्ञानानंद हा सामना जिंकला असता तर २१ वर्षांनंतर एखाद्या भारतीयाने हे विजेतेपद पटकावले असते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number