रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट

वृत्तसंस्था, हरियाणा   हरियाणाच्या गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नव वळण मिळालंय. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने शाळेतील अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय. त्याची चौकशी सुरु आहे. अटक करण्यात आलेला आरोपी प्रद्युम्नची हत्या झाली त्यावेळी शाळेच्या बाथरूमध्ये उपस्थित होता, असा संशय सीबीआयच्या तपास पथकाला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या विद्यार्थ्यावर संशय बळावला. त्यानंतर […]

रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट

वृत्तसंस्था, हरियाणा

 

हरियाणाच्या गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नव वळण मिळालंय. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने शाळेतील अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय. त्याची चौकशी सुरु आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी प्रद्युम्नची हत्या झाली त्यावेळी शाळेच्या बाथरूमध्ये उपस्थित होता, असा संशय सीबीआयच्या तपास पथकाला आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या विद्यार्थ्यावर संशय बळावला. त्यानंतर 11 वीच्या सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली कारण फुटेजमध्ये विद्यार्थ्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. चौकशीनंतर सीबीआय पथकाने आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय.

परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली अशी खळबळजनक माहिती सीबीआयने दिलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number