प्रभारी सरोज पांडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. छत्तीसगडमधून सरोज पांडे यांना उमेदवारी मिळाली आहे. थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सरोज पांडे यांच्यासोबतच अनिल बलुनी, जीव्हीएल नरसिंहा या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. राज्यसभेच्या खासदारकीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत उद्या, म्हणजेच सोमवारी […]

प्रभारी सरोज पांडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. छत्तीसगडमधून सरोज पांडे यांना उमेदवारी मिळाली आहे. थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

सरोज पांडे यांच्यासोबतच अनिल बलुनी, जीव्हीएल नरसिंहा या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. राज्यसभेच्या खासदारकीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत उद्या, म्हणजेच सोमवारी संपणार आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेसची यादी आज रविवारीच जाहीर होईल. महाराष्ट्रातून सहापैकी चार नावं जाहीर झाली आहेत.

भाजपने एकूण नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये सर्व केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून भाजपकडून प्रकाश जावडेकर आणि नारायण राणे अशी दोन नावं जाहीर झाली आहेत. नारायण राणे सोमवारीच अर्ज दाखल करणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number