‘निलंबनाचा अधिकार फक्त अध्यक्षांना’

राज्यातील सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. तसेच राज्यातील सत्ता संघर्षाबद्दल निकाल या आठवड्यात कधीही लागू शकतो. तर, अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निलंबनाचा अधिकार फक्त अध्यक्षांना असून कोर्ट, अन्य संस्थांना अधिकार नाही, असं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालावर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे. त्यामुळे निकाल काय लागेल याबद्दल अनेक तर्कवितर्क […]

‘निलंबनाचा अधिकार फक्त अध्यक्षांना’

राज्यातील सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. तसेच राज्यातील सत्ता संघर्षाबद्दल निकाल या आठवड्यात कधीही लागू शकतो. तर, अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निलंबनाचा अधिकार फक्त अध्यक्षांना असून कोर्ट, अन्य संस्थांना अधिकार नाही, असं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालावर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे. त्यामुळे निकाल काय लागेल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

कोर्टाचा निकाल विरोधात लागून सरकार पडेल असा दावा मविआ नेत्यांकडून केला जात आहे. पण निलंबनाचा अधिकार फक्त अध्यक्षांना असून कोर्ट, अन्य संस्थांना अधिकार नाही, असा दावा नार्वेकरांनी केला आहे. विधानसभेचे जे नियम आहेत त्यावर मी बोलतो. जेव्हा अध्यक्ष नसतात तेव्हा त्यांचे अधिकार उपाध्यक्ष यांच्याकडे चार्ज असतो पण जेव्हा अध्यक्ष असतात तेव्हा चार्ज थेट अध्यक्षाकडे असतो. निलंबनाबाबत कारवाई केवळ विधानसभा अध्यक्ष करू शकतात. जोवर अध्यक्ष याचिकावर निर्णय देत नाही तोवर कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही असा कायदा सांगतो, असंही नार्वेकर म्हणाले.

लंडनला जाण्याचा हा कार्यक्रम पूर्वनियोजित आहे. इंडिया ग्रोथ अँड वर्थ यावर माझं भाषण असणार आहे. केम्ब्रिज इथं विद्यार्थ्यांसोबत एक कार्यक्रम असणार आहे. कोर्टात जी बाब न्याय प्रविष्ट आहे त्याचा निकाल काही मी देणार नाही. या दौऱ्याचा निकालाशी काडी मात्र सबंध नाही, असा खुलासाही नार्वेकरांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number