आली सत्ता, मिळाला नवा पत्ता

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारलाअजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर लगेचच २ जुलै रोजी अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत ८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या नव्या मंत्र्यांना आता शासकीय बंगले, निवासस्थानाचे आणि दालनाचे वाटप करण्यात आले आहे. अजित पवारांसह त्यांच्या समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेवून आठवडा उलटला […]

आली सत्ता, मिळाला नवा पत्ता

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारलाअजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर लगेचच २ जुलै रोजी अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत ८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या नव्या मंत्र्यांना आता शासकीय बंगले, निवासस्थानाचे आणि दालनाचे वाटप करण्यात आले आहे.

अजित पवारांसह त्यांच्या समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेवून आठवडा उलटला आहे. पण, या मंत्र्यांच्या खातेवाटपाचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं गेलं, पण त्यांना कुठलं खातं मिळणार यापेक्षा जास्त अजित पवार मंत्रालयात कुठे बसणार? त्यांचं कार्यालय सहाव्या मजल्यावर कार्यालय मिळणार की दुसऱ्या कुठल्या मजल्यावर? याबाबत आता शासन आणि प्रशासनाकडून चर्चा सुरू आहे. अशातच इतर मंत्र्यांना मंत्रालयामध्ये दालन वाटप करण्यात आले आहे.

कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला?

छगन भुजबळ – २०१ नंबर दालन दुसरा मजला

हसन मुश्रीफ – ४०७ नंबरचे दालन, ४ मजला

दिलिप वळसे पाटील – ३०३ नंबर दालन, तिसरा मजला

धनंजय मुंडे – २०१ ते २०४ आणि २१२ नंबरचे दालन, दुसरा मजला

धर्मराव बाबा आत्राम, ६०१, ६०२ व ६०४, सहावा मजला

आदिती तटकरे, दालन नंबर १०३, मुख्य इमारत

अनिल पाटील – दालन नंबर ४०१, ४ मजला, मुख्य मंत्रालय इमारत

संजय बनसोडे, दालन नंबर ३०१ , मुख्य मंत्रालय इमारत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number