‘रस्ते-खड्ड्यांची जबाबदारी पालिकेची’, कोर्टात सरकारने मांडली भूमिका

वृत्तसंस्था, मुंबई मुंबईतील वाहतूककोंडीसाठी प्रामुख्याने खराब रस्ते व रस्त्यांवरील खड्डे कारणीभूत आहेत. त्यामुळे याविषयी योग्य ते उपाय करून वाहतूककोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे, अशी भूमिका राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडली. मुंबईतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकार व महापालिकेला निर्देश द्यावेत, अशा विनंतीची जनहित याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर खंडपीठात […]

‘रस्ते-खड्ड्यांची जबाबदारी पालिकेची’, कोर्टात सरकारने मांडली भूमिका

वृत्तसंस्था, मुंबई

मुंबईतील वाहतूककोंडीसाठी प्रामुख्याने खराब रस्ते व रस्त्यांवरील खड्डे कारणीभूत आहेत. त्यामुळे याविषयी योग्य ते उपाय करून वाहतूककोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे, अशी भूमिका राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडली. मुंबईतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकार व महापालिकेला निर्देश द्यावेत, अशा विनंतीची जनहित याचिका करण्यात आली होती.

या याचिकेवर खंडपीठात झालेल्या सुनावणीत सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी म्हणणे मांडले. अनेक ठिकाणी खराब रस्ते किंवा खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन कोंडी होते. त्यामुळे रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी पालिकेची आहे. असं म्हंटले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number