सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून ३० जूननंतर राज्यातील पाऊस अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांचा जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमात बाधा येऊ शकते. तसेच मतदानापासून मतदार वंचित राहू शकतात. अशी कारणे पुढे करून सहकार विभागाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्यसंख्या असलेल्या […]

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून ३० जूननंतर राज्यातील पाऊस अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांचा जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमात बाधा येऊ शकते. तसेच मतदानापासून मतदार वंचित राहू शकतात. अशी कारणे पुढे करून सहकार विभागाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्यसंख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था, न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्था, त्याचप्रमाणे ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा संस्थांना निवडणुका घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर सर्व सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सहकार विभागाकडून जाहीर करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number