Maharashtra Weather Update: राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीठ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.<br/>

Maharashtra Weather Update: राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात हवामानात वेगाने बदल होत असून आगामी आठवडाभर राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विशेषतः राज्याच्या दक्षिण भागात उद्या दुपारनंतर वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीठ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

30 आणि 31 मार्च रोजी गारपिटीची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 30 मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या काळात ताशी वेगाने वादळी वारे वाहतील आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची भीती आहे. ही स्थिती 31 मार्च रोजीही कायम राहू शकते, ज्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – CM Fadnavis : इंधन आणि खतांच्या टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे सातत्याने लक्ष ठेवावे. काढणी केलेले रब्बी पीक सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे आणि शेतीकामांचे नियोजन हवामान पाहूनच करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number