भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट

मुंबई, २ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: आशिया कप २०२३ मधील तिसऱ्या सामन्यावर सर्वांची नजर असणार आहे. महामुकाबला भारत-पाकमध्ये होणार आहे. दोन्ही संघ जवळपास ४ वर्षांनी आमने-सामने आले आहेत. आजच्या मुकाबल्यासाठी दोन्ही संघाच्या शिलेदारांनी चांगली तयारी केली आहे. मात्र सामन्यामध्ये मोठं संकट आलं आहे. हवामान खात्याने आधीच अंदाज वर्तवला होता की, आजच्या सामन्यात ७० ते ८० टक्के […]

भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट

मुंबई, २ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: आशिया कप २०२३ मधील तिसऱ्या सामन्यावर सर्वांची नजर असणार आहे. महामुकाबला भारत-पाकमध्ये होणार आहे. दोन्ही संघ जवळपास ४ वर्षांनी आमने-सामने आले आहेत. आजच्या मुकाबल्यासाठी दोन्ही संघाच्या शिलेदारांनी चांगली तयारी केली आहे. मात्र सामन्यामध्ये मोठं संकट आलं आहे. हवामान खात्याने आधीच अंदाज वर्तवला होता की, आजच्या सामन्यात ७० ते ८० टक्के पाऊस येणार आहे. हे आस्मानी संकट असताना आणखी एका संकटाची भर पडली आहे.

पावसामुळे सामन्यामध्ये व्यत्यय येणार असल्याचं सांगितलं पण आता वातावरण आणखी खराब होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पावसाससह विजांचा कडडाटही होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. दुपारच्या सुमारास ५५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

भारत -पाक सामन्यामध्ये पावसाने हजेरी लावली आणि शेवटी सामना रद्द करावा लागला दोन्ही संघांन एक एक गुण दिला जावू शकतो. याआधी दोन्ही संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल चार वर्षांनी एकमेकांना भिडणार आहेत. वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा याने शतक झळकवलं होतं.

भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत १३२ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामधील पाकिस्तानने ७३ आणि भारताने ५५ जिंकले आहेत, राहिलेले चार सामने अनिर्णित राहिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number