मुंबईवर खलिस्तानी अतिरेकी हल्ल्याची शक्यता

नव वर्षाच्या सुरूवातीलाच मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत खलिस्तान्यांकडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून वर्तविण्यात आल्याने सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक रजादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. गुप्तचर यंत्रणाकडून मुंबई पोलिसांना हल्ला होणार असल्याची माहिती दिल्यामुळे सर्वत्र बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले […]

मुंबईवर खलिस्तानी अतिरेकी हल्ल्याची शक्यता

नव वर्षाच्या सुरूवातीलाच मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत खलिस्तान्यांकडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून वर्तविण्यात आल्याने सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक रजादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.

गुप्तचर यंत्रणाकडून मुंबई पोलिसांना हल्ला होणार असल्याची माहिती दिल्यामुळे सर्वत्र बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईत नव वर्षाच्या सुरूवातीलाच दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे गुप्तचर यंत्रणाकडून सांगण्यात येत आहे.

नव वर्षाच्या सुरूवातीला मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याचा कट रचण्यात येत आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल. मागील गुरुवारी लुधियाना न्यायालयात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत खलिस्तानी अतिरेक्यांकडून हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number