तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवभक्तांची अलोट गर्दी

तिसऱ्या श्रावण सोमवारी देशभरातील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्यातील भिमाशंकर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकानी रांगा लावून दर्शन घेतले. भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकाचा महापुर लोटला. अभिषेक करण्यासाठी सामान्य भाविकांपासून ते अगदी नेते मंडळीही रात्रीपासून दाखल झाले. रविवारी दुपारपासूनच भाविकांनी भीमाशंकराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला .  वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 7 […]

तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवभक्तांची अलोट गर्दी

तिसऱ्या श्रावण सोमवारी देशभरातील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्यातील भिमाशंकर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकानी रांगा लावून दर्शन घेतले. भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकाचा महापुर लोटला.

अभिषेक करण्यासाठी सामान्य भाविकांपासून ते अगदी नेते मंडळीही रात्रीपासून दाखल झाले. रविवारी दुपारपासूनच भाविकांनी भीमाशंकराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला . 

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 7 किलोमीटर अंतरापासूनच हलक्या आणि जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला.

कोकणामध्येही दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री कुणकेश्वर क्षेत्र या ठिकाणीही तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने शिवभक्तांनी स्वयंभू कुणकेश्वराचं भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतलं. कोकणात अनेक अशी स्वयंभू मंदिरे पहायला मिळतात, पण कुणकेश्वर हे क्षेत्र प्रत्येक शिवभक्तांला आकर्षित करतं. त्यामुळे भाविकांची मोठया प्रमाणावर या शिव मंदिराकडे ओढ असते.

तसंच मंदिराच्या आजूबाजूला समुद्र असल्यामुळे हे मंदिर अधिकच सुंदर दिसतं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक कुणकेश्वरला दर्शनासाठी येत असतात. आज तिसरा श्रवण सोमवार असल्याने गोवा, कोल्हापूर, सांगली या भागांतून भाविक श्रवण निमित्ताने कुणकेश्वर क्षेत्री येतात.

शिर्डीतही साईबाबांच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली असून साईबाबांच्या समाधीवर बेलांची पाने ठेवण्यात आली असून साईबाबांच्या मूर्तीलाही बेलांच्या पानांची माळ साई मंदिरातील पुजाऱ्यांकडून घालण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number