अंगणवाडी सेविकांसाठी सकारात्मक निर्णय

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत. अंगणवाडी सेविका थेट रायगड किल्ल्यावर पोहोचल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर आंदोलन केले. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी […]

अंगणवाडी सेविकांसाठी सकारात्मक निर्णय

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत. अंगणवाडी सेविका थेट रायगड किल्ल्यावर पोहोचल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर आंदोलन केले. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतलाय. यासंबधी आता महत्वाची बातमी समोर येत असून अंगणवाडी सेवाकांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा झाली आहे.

सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना दिड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार, मात्र त्यात कर्मचार्यांच्या व सरकार यांच्या सहभागाने ती होणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार असल्याचेही या बैठकीत ठरले आहे.

दरम्यान, मानधन, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा अशा मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी २० फेब्रुवारीपासून संप सुरु केला होता. आज सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number