‘पोलखोल थांबणार नाही’ – देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पालिकेतील भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी भाजपाच्यावतीने पोलखोल अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. चेंबूर कॅम्पयेथील भाजपा कार्यालयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत या रथ यात्रेची सुरूवात होणार होती. मात्र, रथयात्रेच्या आधल्या रात्री रथाची तोडफोड करत नुकसान केले आहे. रथाची तोडफोड केल्यामुळे भाजप नेते आक्रमक […]

‘पोलखोल थांबणार नाही’ – देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पालिकेतील भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी भाजपाच्यावतीने पोलखोल अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. चेंबूर कॅम्पयेथील भाजपा कार्यालयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत या रथ यात्रेची सुरूवात होणार होती. मात्र, रथयात्रेच्या आधल्या रात्री रथाची तोडफोड करत नुकसान केले आहे. रथाची तोडफोड केल्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांमध्ये अस्वस्थतता पसरली असल्याने आमच्या यात्रांवर हल्ला करत आहे. त्यामुळे त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की,  कितीही हल्ला करा, पोलखोल थांबणार नाही, आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढणारच, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

प्रसाद लाड यांचा इशारा

तसेच रथाची तोडफोड झाल्याप्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर या ठिकाणी भाजपचे सर्व नेते एकवटतील आणि जनतेच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे.

ठिय्या करण्याचा दरेकरांचा इशारा

पोलखोल रथ यात्रेला नागरिकांकून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अज्ञातांकडून रथाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे तोडफोड करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली नाही तर पोलीस ठाण्यात येऊन ठिय्या आंदोलन करू, अशा इशारा दरेकरांनी दिला आहे. तसेच हा शिवसेनेचा डाव आहे, भ्रष्टाचार उघडकीस होईल याची शिवसेनेला भीती आहे, असा टोलाही प्रवीण दरेकरांनी लगावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number